जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
केंद्रीय मंत्रिमंडाळाच्या विस्तारानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये केले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अजूनही मुख्यमंत्र्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे.
मत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी स्मितहास्य देत विस्तार मात्र नक्की होणार अशी प्रतिक्रिया दिली.