ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांत मुख्यमंत्र्यांना अनपेक्षित धक्का

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अनपेक्षित धक्का बसलाय. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झालाय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार धनश्री टोमणे यांनी विजय मिळवलाय. तर, दुसरीकडे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीतही […]

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांत मुख्यमंत्र्यांना अनपेक्षित धक्का

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अनपेक्षित धक्का बसलाय.

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झालाय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार धनश्री टोमणे यांनी विजय मिळवलाय.

तर, दुसरीकडे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झालाय. या ठिकाणी काँग्रेसचे सुनील गंगाराम दुधपचारे सरपंचपदी निवडून आले..गेल्या काही दिवसांत भाजपला नांदेड महानगरपालिका आणि देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपनं आपल्याला मोठे यश मिळाल्याचा दावा केला होता. मात्र, आता दत्तक गावाला भाजपानं सोडलं की काय असं चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number