जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दक्षिण कोरियाचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री किम डाँगयून यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारने आतापर्यंत केलेली तयारी, या प्रकल्पामुळे होणारे लाभ याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन किम डाँगयून यांनी दिले. त्यामुळे ही बैठक सकारात्मक झाल्याचं बोललं जात आहे.