जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पून्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला आहे. भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरुप आहेत.
हेलिकॉप्टर उतरवताना पुन्हा टेकऑफ केल्यानं ही दुर्घटना टळली.
हेलिकॉप्टर उतरवताना केबलची वायर दिसल्यानं पायलटने अचानक टेकऑफ केलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली.