लवकरच रिपाइंला मंत्रीपद देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच रिपाइंच्या 31व्या वर्धापन दिनी ते बोलत होते.
ठाण्यातील रिपाइंच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच राज्यघटना बदलण्याचा अधिकार कुणालाच नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. ‘बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्यासाठी आम्ही जमीन दिल्याचं’ही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
संविधान बदलणार नाही, बदलू देणार नाही; बायबल आणि गीता याप्रमाणेच आम्हाला संविधान प्रिय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.