मुख्यमंत्री सहाय्यता निधी वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   मुख्यमंत्र्यांनी गरीब जनतेला मदत व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुरु केला. मात्र, सरकार मदत करत असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे परवानग्या आणि कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकल्याने निधी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला.     नागपूरमधील लोचन बांबुर्डे यांना ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या […]

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

मुख्यमंत्र्यांनी गरीब जनतेला मदत व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी सुरु केला. मात्र, सरकार मदत करत असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे परवानग्या आणि कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकल्याने निधी वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला.

 

 

नागपूरमधील लोचन बांबुर्डे यांना ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागणार होती. शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपये खर्च होणार होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांचा मुलगा कमलेश बांबुर्डेला ट्रामा सेंटरच्या डॉक्टर राठोडांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत घेण्यास सांगितलं.

 

मात्र, त्यासाठी आवश्यक असणार एस्टीमेटम देण्यास विलंब केला. यामुळे विविध परवानग्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या कमलेश यांना तब्बल 8 दिवसांनी निधी मंजूर झाला. निधी मंजूर झाल्यावरही डॉक्टर राठोड यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीवर शंका घेतली.

 

निधी तात्काळ मंजूर झाला नाही. तर पैसे कोण देणार असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा निधी तात्काळ मिळावा यासाठी कलेक्टर ऑफिसच्या चकरा माराव्या लागल्या. या सगळ्या परवानग्या घेताना कमलेश यांची प्रकृती मात्र खालावली आणि त्यांचा 26 एप्रिलला मृत्यू झाला. निधी वेळत मंजूर झाला असता तर, वडिलांचे प्राण वाचले असते असं कमलेश बांगुर्डे यांचं म्हणणं आहे.

 

 

दरम्यान, परवासाठी हेलपाटे घ्यावे लागल्याने वडीलांना वेळेत उपचार मिळू शकले नसल्याचं कमलेश यांचं म्हणणं आहे. कमलेश बांगुर्डे यांनी आपली व्यथा जय महाराष्ट्रकडे मांडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number