‘केईएमच्या सहा कक्षांचे काम वेगाने पूर्ण करा’

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या सहा कक्षांचे काम वेगाने पूर्ण करा. या कामावर मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. केईएम रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या कारभाराचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. मुंबईत असलेल्या केईएम रुग्णालयाला ९७ वर्षे झाली आहेत. या रुग्णालयातील सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी […]

‘केईएमच्या सहा कक्षांचे काम वेगाने पूर्ण करा’

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या सहा कक्षांचे काम वेगाने पूर्ण करा. या कामावर मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. केईएम रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या कारभाराचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

मुंबईत असलेल्या केईएम रुग्णालयाला ९७ वर्षे झाली आहेत. या रुग्णालयातील सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अचानक केईएम रुग्णालयाचा दौरा करून तिथल्या कारभाराचा आढावा घेतला. थेट रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध कक्षांमधील सोयीसुविधा जाणून घेतल्या.

केईएममध्ये सहा कक्षांचे काम सुरू आहे. काम सुरू असल्यामुळे हे कक्ष बंद आहेत. हे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बंद असलेले कक्ष लवकर सुरू झाले तर आणखी किमान ४०० ते ४५० रुग्णांवर उपचार करता येतील. रुग्णांच्या आर्थिक अडचणी असतील तर नियमानुसार मदत दिली जाईल पण उपचार थांबणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number