‘दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील’ – देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईच्या लोअर परेल जवळील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री आग लागल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यात 14 ठार, अनेक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मुंबईच्या सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये तीन हॉटेल्स आहेत. ज्यात हॉटेल मोजेज बिस्त्रो, वन अबव आणि लंडन टॅक्सीचा […]

‘दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील’ – देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या लोअर परेल जवळील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री आग लागल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. यात 14 ठार, अनेक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मुंबईच्या सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये तीन हॉटेल्स आहेत. ज्यात हॉटेल मोजेज बिस्त्रो, वन अबव आणि लंडन टॅक्सीचा समावेश आहे.

आग लागली त्यावेळी अडकलेले लोक बाथरुममध्ये जाऊन लपले आणि आग वाढल्याने त्यांचा गुदमरुन तिथेच मृत्यू झाला. या घटनेनंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल कंपाऊंडला भेट दिली. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत हॉटेल मालकांवर तर  कारवाई होणारच”, असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा 5 बीएमसी अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. इतकेच नाही तर जाणीवपूर्वक परवाने दिले असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number