जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
15 वर्षात त्यांनी जे प्रश्न निर्माण केले ते प्रश्न आम्ही सोडवावे, असं त्यांना वाटतं. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलंय. ज्या शेतकऱ्यांना अर्जभरता आला नाही, त्यांना 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आले.
एकूण 16 विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिली.