जय महाराष्ट्र न्यूज, अलिबाग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पून्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.
आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटना सोहळ्यासाठी अलिबाग येथे आले होते.
हा कार्यक्रम संपल्यानंतर डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत
असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला.
हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले
असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.
त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड करुन फॅनची रिटेस्ट घेवून त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईस रवाना झाले.
यापूर्वी 25 मे रोजी लातूरहून मुंबईस येत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पाश्वर्भूमीवर आजच्या या प्रसंगावेळी उपस्थित सर्वांच्याच
काळजाचा ठोका चुकला होता.