संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा नाही ; मुख्यमंत्र्यांकडून अप्रत्यक्ष क्लीनचीट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबईसंभाजी भिडेंविरूद्ध अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंना अप्रत्यक्षपणे क्लीनचीट दिली आहे. संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी काल मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत माहिती दिली आहे.कोरेगाव भीमा इथं झालेली घटना गंभीर असून या प्रकरणाची चौकशी थांबवलेली […]

संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा नाही ; मुख्यमंत्र्यांकडून अप्रत्यक्ष क्लीनचीट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
संभाजी भिडेंविरूद्ध अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडेंना अप्रत्यक्षपणे क्लीनचीट दिली आहे. संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी काल मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत माहिती दिली आहे.
कोरेगाव भीमा इथं झालेली घटना गंभीर असून या प्रकरणाची चौकशी थांबवलेली नाही. प्रकाश आंबेडकरांनी काल दिलेल्या नवीन पुराव्यांबाबतही तपास करण्यात येईल. माझ्या घरातीलही जर कोणी दोषी आढळलं तरी कोणालाही सोडणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
दंगलीनंतर एका महिलेने आपण मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना दंगलीत सहभागी असल्याचं पाहिलं आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर एकबोटे व भिडेंवर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीसांनी काही दिवसांपूर्वी एकबोटेंना अटक केली होती. परंतु संभाजी भिडेंवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता दोषींवर कारवाई होते का, हे पहावं लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number