जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे याच पार्श्वभूमीवर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंदोलकांशी चर्चा केली आहे.
यावेळी नारायण राणे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीनंतर सरकार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
या बैठकीत आरक्षणा संदर्भात चर्चा झाली असून मागासवर्ग आयोगाने अहवाल दिल्या नंतर एक महिन्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले आहे.
तसेच पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज आंदोलकांशी चर्चा
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा – गडकरी
मराठा आरक्षण : सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थित बैठक सपंन्न…
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले राणे?