पर्यावरणाची हानी होऊ न देता जर शाश्वत विकास करायचा असेल तर आपल्याला पर्यायी इंधनांसारखे मार्ग निवडणे आवश्यक आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात आयोजित इंधन परिषदेचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र शासन शाश्वत ऊर्जा आणि पर्यायी इंधन वापरासाठी वचनबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
तसेच, ‘महाराष्ट्र केवळ राज्याचा विचार न करता देशाचा विचार करत आहे. पर्यायी इंधनासंदर्भात व्यापक चर्चा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे आणि या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्त्व करेल.’ असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र नेहमी दिशा दाखवणारे राज्य आहे. राज्यात ज्या गोष्टीची सुरूवात होते त्याचा स्वीकार संपूर्ण देश करतो. म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येणे शक्य असतील त्या केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.