वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा दावा खोटा – फडणवीस

महाराष्ट्र औद्योगिदृष्ट्या देशात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प राबवण्यात येण्यात येत आहे. मात्र, काही महिन्यांमध्ये वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क आणि टाटा एअरबस असे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्यात आल्याच्या चर्चेला जोर आला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण […]

वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा दावा खोटा – फडणवीस

महाराष्ट्र औद्योगिदृष्ट्या देशात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प राबवण्यात येण्यात येत आहे. मात्र, काही महिन्यांमध्ये वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क आणि टाटा एअरबस असे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्यात आल्याच्या चर्चेला जोर आला. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्लीत स्थलांतरित करण्याचा कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची पुनरर्चना करण्यासाठी आणि या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त आणि ५ अधिकाऱ्यांना दिल्लीत येण्यास सांगितले आहे. या आयुक्तालयात ५०० अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योग आयुक्तालय मुंबईहून दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याच्या चर्चेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले असून वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा दावा खोटा असल्याचे फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number