धर्मांतर तसेच लव्ह-जिहादच्या दडलेल्या अनेक कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. तर, मोबाईल गेमद्वारे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. काही दिवसांपूर्वीच मुंब्रा भागात ४०० जणांचं धर्मांतर झाल्याचा गौप्यस्फोटही झाला. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात टोलेबाजी करण्यात आली आहे.
सध्या देशभरात धर्मांतरऑनलाईन धर्मांतरचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली होती. धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्रा येथे सुमारे ४०० जणांचं धर्मांतर झाल्याची धक्कादायक माहिती गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांनी दिली होती. परंतु, मोबाईल गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचे आव्हाडांनी फेटाळले होते. त्यानंतर, सामना वृत्तपत्रानेही ४०० जणांच्या धर्मांतराचे वृत्त छापले. त्यामुळे, धर्मांतर फेटाळलेल्या आव्हाडांना ‘सामनातही ४०० जणांच्या धर्मांतराचा दावा’ असे म्हणत निलेश राणे यांनी सामनातली बातमी समोर आणून आव्हाडांना चांगलाच टोला लगावला आहे.