मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई पाच मजली इमारत कोसळ्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत. तर 40 ते 50 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. इमारत कोसळल्याने 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच कोणीही घटनास्थळी गर्दी करू नये किंवा भेट देऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केसरबाई इमारत 100 वर्ष जूनी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
इमारतीतील अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे महत्वाचे असल्याचे आहे.
तसेच घटनास्थळी जास्त लोकांनी भेट देऊ नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
बचावकार्यात अडथळे न येण्यासाठी नागरीकांनी गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
CM @Dev_Fadnavis speaks to media on #MumbaiBuildingCollapse incident in Dongri where more than 40 people are feared trapped.https://t.co/Og4hxSCTqK pic.twitter.com/K1duZqa1y8 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2019
केसरबाई इमारत म्हाडाची आहे.
गृहनिर्माण खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल झाले आहे.
१० ते १५ कुटुंबं रहिवासी होते.
बचावकार्य सुरू असून चिंचोळ्या भागामुळे अडथळे निर्माण झाले आहेत.
ढिगाऱ्याखाली 40-50 जण अडकल्याची भीती आहे.