तळई ,माळीन आणि इरशाळवाडीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने काशीद कोपर गावातील जनता भयभीत झाले आहेत. इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या दुर्घटनेत २८ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे ५० पेक्षा अधिक बेपत्ता आहेत तर अनेक जण जखमी झाले होते. संपूर्ण गाव उद्धवस्त झाले असून, येथील लोकांना जगण्यासाठी गरजेचे असणारे मुख्य स्रोत म्हणजेच अन्न,वस्त्र, निवारा देखील उपलब्ध होत नाही आहेत.
या पूर्वी २ वेळा भूस्खलन झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले असून भविष्यात माळीनची परिस्थिती उद्भवल्यास एमएमआरडीएच्या आडमुठे धोरण त्याला कारणीभूत असणार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विरार मधील काशीद कोपर गावाच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी गावकरी आणि पर्यावरण प्रेमी झटत आहेत.
तळई ,माळीनच्या इरशाळवाडी च्या नुकत्याच झालेल्या घटनेन सर्व गाव भयभीत झाले असून, त्या घटनेचा शाळकरी विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. इरशाळ वाडीतील घटना हि नैसर्गिक असून काशीद कोपर मध्ये शासनाने डोंगर पोखरला आहे.