पुणे : सणसर (ता. इंदापूर) येथे वालचंदनगर पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक केली. वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये १७ ऑगस्ट २०२४ रोजी मारामारी व अॅट्रासिटीतंर्गत दिपक मारुती माने, याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासुन तो पोलिसांना सापडत नव्हता. सोमवार (ता. ७) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सणसर ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील बाजार तळावरती बसला असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने माने याला पकडण्यासाठी पथक पाठवले.