जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
खैरलांजी ते कोपर्डी. समाजातली वखवखलेली नजर सर्वच ठिकाणी. अगदी मुंबईतली गजबजलेली स्टेशन्सही याला अपवाद ठरलेली नाहीत.
सीएसटी स्टेशनवर भर रेल्वेत तरुणीला पाहून हस्तमैथून करणाऱ्या निर्लज्ज तरुणाची घटना ताजी आहे. पण चर्चगेट स्टेशनवर असाच एका डोक्यात तिडीक जाणारा
प्रकार समोर आला आहे.
चर्चगेट स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत असणाऱ्या मुलीसोबत विकृत नराधमानं अश्लिल चाळे केलेत. या विकृतानं वाट पाहणाऱ्या तरुणीला नकोसा स्पर्श केला.
या मुलीनं सेकंदाच्या आत या नराधमाचा पाठलाग केला. आरडाओरडा केला. तेव्हा हा विकृत पळायला लागला. पण, बहाद्दर मुलीनं त्याचा पाठलाग सुरु ठेवला.
अखेर महिला पोलिसांनी या विकृताच्या मुसक्या आवळल्या. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पण हा विकृतही अल्पवयीन मुलगा असल्याने त्याची रवानगी
बालसुधारगृहात करण्यात आली.