काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराप्रकरणी केंद्र सरकारला दणका दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चौकीदार चोर है मान्य केले असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्यामुळे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले होते. राहुल गांधींच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून माफी मागितली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान चौकीदार चोर है अशा घोषणा दिल्या होत्या.
त्याचवेळीस सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारासंदर्भात केंद्र सरकारला दणका दिला होता.
मात्र राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचे म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी दणका दिला आहे.
राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्यावतीने माफी मागितली असून प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.