आई आजारी असल्याच सांगत पैसे उकळणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

आई आजारी आहे तिच्या अंत्यविधीसाठी पैसे नाहीत; अशी बतावणी करून पैसे मागत होता. मात्र हा प्रकार लक्षात आल्‍याने पैसे उकळणाऱ्या भामट्याला मनसे सहकार सेनेच्‍या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिला.आईच्या आजाराच्या नावावर तरुण मनसे पदाधिकाऱ्याकडून वारंवार पैश्याची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. सदर तरुण फेसबुकवरून मोबाईल नंबर शोधून लोकांना आई आजारी आहे; असे सांगून पैसे घेऊन […]

आई आजारी असल्याच सांगत पैसे उकळणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

आई आजारी आहे तिच्या अंत्यविधीसाठी पैसे नाहीत; अशी बतावणी करून पैसे मागत होता. मात्र हा प्रकार लक्षात आल्‍याने पैसे उकळणाऱ्या भामट्याला मनसे सहकार सेनेच्‍या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिला.आईच्या आजाराच्या नावावर तरुण मनसे पदाधिकाऱ्याकडून वारंवार पैश्याची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले.

सदर तरुण फेसबुकवरून मोबाईल नंबर शोधून लोकांना आई आजारी आहे; असे सांगून पैसे घेऊन परत आई वारली अशी खोटी बतावणी करून पैसे लाटत होता. वारंवार पैशांची मागणी करत असल्याने संशय आल्यावर मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पकडून चांगलाच चोप दिला.

आई जिवंत असताना विजय तीवर हा तरुण नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करत असल्याचे समोर आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले.v

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number