चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा ‘मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डनं सन्मान

स्वप्नील जोशीचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश’पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलंय. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा झेंडा स्वपनिल जोशींना फडकावला आहे. स्वप्नीलचं प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ या […]

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीचा ‘मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डनं सन्मान

स्वप्नील जोशीचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश’पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलंय. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा झेंडा स्वपनिल जोशींना फडकावला आहे.

स्वप्नीलचं प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ या सोहळ्यात ‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू रिजनल सिनेमा बेस्ट एक्टर अवॉर्ड’हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबईत ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९’ हा भव्य सोहळा दिमाखात पार पडला. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूड, मराठी आणि बिझिनेस जगतासह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते.

काय म्हणाला स्वप्नील जोशी ?

‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू रिजनल सिनेमा बेस्ट एक्टर ’चा अवार्ड मला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात मला दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. या पुरस्काराच्या पहिल्या वर्षी मला ‘यंग अचिवर्स’पुरस्काराने गौरवण्यात आलं.

तर यावर्षी प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ मिळाला. तर हिंदीमध्ये हा अवॉर्ड अजय देवगण यांना मिळाला आहे.

हा ‘मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ मिळाला याचा मला खूप आनंद आणि आभिमान होत आहे यापुढे ही मी मायबाप रसिक प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहीन.”

असे स्वप्नील जोशी म्हणाला.

याशिवाय स्वप्नील जोशीचा रेडिओवर ‘रेडिओ शो शेअरिट टू स्वप्नील’ हा शो येतोय तो लवकरच श्रोत्यांना २३ डिसेंबरपासून रेडिओवर ऐकायला मिळणार आहे’.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number