जय महाराष्ट्र न्यूज,चंद्रपुर
चंद्रपुरच्या जीवती तालुक्यात स्वच्छता अभियान मिशनचा फज्जा उडाल्याचं चित्र निर्माण झाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका कार्यक्रमात जीवती ग्रामपंचायत हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा झाली. मात्र, जय महाराष्ट्रने जीवती ग्रामपंचायतीचा आढावा घेतला असता जीवती जिल्ह्यातल्या खडकी रायपूर, पाटण लांबोरी गावांमध्ये सरकारी शौचालयांचा मागमूसही सापडला नाही.
येथील ग्रामस्थांनी सरकारी लोकांवर निधी लुटल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारकडून जीवती तालुक्यासाठी 3 कोटींचा निधी मंजूर झाला होता.
मात्र, या निधीतून 300 शौचालंयं ही बांधण्यात आली नाहीत. त्यामुळे हा निधी कुठे खर्च झाला असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
त्यामुळे आता स्वच्छतेचा नारा देणारं सरकार या सरकारी बाबूंवर नक्की काय कारवाई करणार याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिले आहे.