राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांच्यासह महिला कार्यकर्त्या पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत पेट्रोल दरवाढीचा भडका उडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल दरवाढीचा निषेध केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्य़ांनी मंत्रालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करून या दरवाढीचा निषेध केला.   राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या महिलांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणून इनोव्हा गाडीला धक्का मारला.   तर, […]

राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांच्यासह महिला कार्यकर्त्या पोलिसांच्या ताब्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत पेट्रोल दरवाढीचा भडका उडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पेट्रोल दरवाढीचा निषेध केला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्य़ांनी मंत्रालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करून या दरवाढीचा निषेध केला.

 

राष्ट्रवादी महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या महिलांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध म्हणून इनोव्हा गाडीला धक्का मारला.

 

तर, अॅक्टिव्हा या दुचाकीला हातगाडीवर बांधण्य़ात आले होते. मंत्रालयाच्य़ा समोरून महिलांनी गाडी ओढत हे अनोखे आंदोलन केले. दरम्यान, चित्रा वाघ यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number