राज्यात आणि देशात प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळ्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अशाच खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींना रंगेहात अटक करण्याच आली आहे.
चिपळूण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोकणातील चिपळूणमध्ये हा प्रकार समोर आला आहे.
सध्या एका खवल्या मांजराची किंमत ४० लाख इतकी आहे. यानुसार या आरोप्यांकडून २ खवल्या मांजर यांची किंमत ८० लाख जप्त केले आहे.
तसेच पोलिसांनी ७ लाखांची आरोपींची गाडीही जप्त केली आहे. या प्रकारे एकूण ८७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
मुंबई गोवा महामार्गवरुन सकाळच्या दरम्यान खवल्या मांजर घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सापळा रचला. पोलिसांनी या आरोपींना रोख रक्कमेसह अटक केली.
खवल्या मांजरींची तस्करी करण्या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खवल्या मांजरच्या खवल्यांना प्रचंड वाजवी किंमत आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात खवल्या मांजरींच्या तस्करीत वाढ झाली आहे.