आईस्क्रीममध्येही आढळला कोरोनाचा विषाणू

जगात कोरोनाचा प्रकोप आता ही सुरू आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर लसीमुळे वातावरणातील भीती कमी होताना दिसत आहे. जगात संपूर्ण ठिकाणी लस आल्यानंतरही सरकारकडून कोरोनासंदर्भातील सर्व खबरदारी बाळगली जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये आता एक भलतीचं बाब समोर आली आहे. उत्तर चीनमध्ये आईस्क्रीवर कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाची […]

आईस्क्रीममध्येही आढळला कोरोनाचा विषाणू


जगात कोरोनाचा प्रकोप आता ही सुरू आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर लसीमुळे वातावरणातील भीती कमी होताना दिसत आहे. जगात संपूर्ण ठिकाणी लस आल्यानंतरही सरकारकडून कोरोनासंदर्भातील सर्व खबरदारी बाळगली जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये आता एक भलतीचं बाब समोर आली आहे.

उत्तर चीनमध्ये आईस्क्रीवर कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, तातडीची पावलं उचलण्यात आली आहेत. The Daqiaodao Food Co., Ltd.या कंपनीच्या आईस्क्रीमध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आल्यानं प्रशासनानं कंपनी सील केलं आहे. त्याचबरोबर कंपनीत सॅनिटायझेशन केलं आहे. कंपनीतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्याही करण्यात आल्या आहेत. आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आल्यानं पुन्हा एकदा चिंत्येचं वातावरण निर्माण झालं आहे. यातील ३९० डब्ब्याची विक्री करण्यात आली असून, खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

आईस्क्रीममध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आल्यानंतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. १६६२ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ही करण्यात आली असून, त्यापैकी ७०० कर्मचाऱ्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर इतर कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, अशी माहिती प्रशासनानं स्थानिक माध्यमांना दिली. कोरोना संक्रमित आईस्क्रीमचे २९ हजार डब्ब्यांची अद्याप विक्री झालेली नसून फक्त ३९० डब्बेच तियानजिनमध्ये विकले गेले आहे. असं सरकारी अधिकाऱ्यांनी माहिता दिली आहे. स्थानिक प्रशासनानं आता आईस्क्रीम खरेदी करणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. त्याचबरोबर आईस्क्रीम विक्रेत्यांनाही याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. या आईस्क्रीमध्ये न्यूझीलंडमधील दूध भूकटी आणि युक्रेनमधील दह्याची भूकटीचा समावेश केला जातो. हे पदार्थ परदेशातून मागविण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं असल्याचं सरकारनं सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number