जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
नवीन वर्षांत हिरव्या मिरच्यांमुळे भारतीय निर्यातदारांच्या डोळ्यात अश्रू येणार आहेत. युरोपियन देशांनी अलीकडेच भारतातील मिर्चांना कीटकनाशक अवशेषांसाठी उच्च धोका श्रेणीत अपेक्षा केली आहे. अतिकिटकनाशक फवारणीमुळे युरोपियन देशांनी भारतीय मिरचीला अतिधोकादायक ठरवले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्टातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
मिरची उत्पादनात किटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात केली जाते. असे युरोपियन देशाचे म्हणणे आहे. महराष्ट्रात मिरची उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशातच, युरोपियन देशाने मिरची निर्यातीवर बंदी घातल्याने मिरची उत्पादकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.