पोलीस भरतीसाठी मुलांची झुंज

पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल सुरु आहेत. मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांची भविष्यासाठी झुंज सुरु आहे. मुंबई विद्यापीठाची असंवेदनशील भूमिका आहे. पोलीस भरतीसाठी होणाऱ्या ग्राउंड परीक्षेसाठी महाराष्ट्रातले अनेक विध्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर पोहचलेले आहेत. सर्व विद्यार्थी गेटसमोर रस्त्यावर झोपून आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठाने मुलांना आत घेण्यास नकार दिला आहे. विद्यापीठाने त्यांना आत […]

पोलीस भरतीसाठी मुलांची झुंज

पोलीस भरतीचे स्वप्न मुंबईत घेऊन आलेल्या मुलांचे हाल सुरु आहेत. मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांची भविष्यासाठी झुंज सुरु आहे. मुंबई विद्यापीठाची असंवेदनशील भूमिका आहे. पोलीस भरतीसाठी होणाऱ्या ग्राउंड परीक्षेसाठी महाराष्ट्रातले अनेक विध्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या गेटवर पोहचलेले आहेत. सर्व विद्यार्थी गेटसमोर रस्त्यावर झोपून आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठाने मुलांना आत घेण्यास नकार दिला आहे.

विद्यापीठाने त्यांना आत घेऊन,आपल्या कॅम्पस मध्ये सहानुभूती दाखवून निवारा दिला असता तर खूप बरे झाले असते, अशी मांगणी आंबेडकर स्टूडेंट असोशिएशन केली आहे. जर, आपण पाहील तर बीकेसीवर पार पडत असलेल्या सर्व राजकिय सभांच पार्किंग हे मुंबई विद्यापिठात झाले होते. मंत्री आणि नेते कार्यकर्त्यांची राहण्याची सोय इथे केली जात होती. परंतु, या पोलीस भरतीला आलेल्या मु लांना दुजाभाव का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

आज होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी अनेक उमेदवार मुंबई विद्यापीठाबाहेर आले होते. सकाळी विद्यार्थ्यांच्या मैदानी परीक्षा आहेत मात्र विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये सोय केलेली नाही. कुठल्याही प्रकारची सोय न केल्याने विद्यार्थ्यांनी रात्र विद्यापीठाच्या गेट समोर, फुटपाथवर, पुलाखाली मुक्काम काढली.

दरम्यान, पोलीस बनायचं स्वप्न उराशी बाळगून उमेदवार मुंबईत दाखल होतात. परंतु सोयी सुविधांच्या अभावी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एका परीक्षार्थीचा मृत्यू झाला होता. मूळचा वाशिमचा रहिवाशी असलेला गणेश पोलीस भरतीसाठी मुंबईला आला होता. पोलीस भरतीची परीक्षा सुरू असतानाच त्याला अचानक भोवळ आली आणि तो मैदानातच कोसळला होता. त्यावेळी पोलिस भरतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number