जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या अंधेरीतील एका नर्सरी शाळेत शिकत असणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याची घटना उघडकीस आलीय.
याबाबत अंधेरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. शाळेचे ट्रस्टी हे मूळचे जर्मन असून या शाळेत उच्च शिक्षित पालकांच्या मुलांसह अनेक कलाकारांची मुलंही शिक्षण घेतात. या शाळेतील नर्सरीमध्ये पीडित मुलगी शिकत होती.
काही दिवसांपूर्वी तिच्या वागण्यात बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले होते. याबाबत विचारपूस केल्यानंतर सदर घडलेला प्रकार मुलीनं पालकांना सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आलीय.
दरम्यान कोणालाही अटक करण्यात आलेली नसून याप्रकरणी तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी, यासाठीचं पत्र शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांना लिहिलंय.