आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस

कुरळपमध्ये मिनाई आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी नराधम अरविंद पवार यांच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल केला. त्यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच पवारांच्या पुतळ्याचे तिरडी काढून दहन करण्यात आले आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरळपमध्ये मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाल्याची […]

आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस

कुरळपमध्ये मिनाई आश्रमशाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणी ग्रामस्थांचा उद्रेक झाला आहे. संतप्त ग्रामस्थांनी नराधम अरविंद पवार यांच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल केला. त्यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. तसेच पवारांच्या पुतळ्याचे तिरडी काढून दहन करण्यात आले आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुरळपमध्ये मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याचे तीव्र पडसाद कुरळप गावात उमटले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ अरविंद पवार याच्या आश्रमशाळेवर हल्लाबोल करत आश्रमशाळेतील संस्था संचालक नराधम पवारच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी नराधम अरविंद पवार याच्या निषेधार्थ गावातून मोर्चा काढून पवार याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे तिरडीवरून फेरी काढत पुतळ्याचे दहन करण्यात आले.

कुरळप ग्रामस्थांनी गावाला कलंक लावणाऱ्या या घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या प्रकरणात पवार आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संबंध घटनेबाबत गावामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर कुरळप गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number