न्यायाधीशांच्या घरात घडत होते हे कृत्य; महिला आयोगाच्या सदस्यांनी केला प्रकार उघड

वृत्तसंस्था, उत्तराखंड बालकामगाराला बंदी असतांनादेखील देशाच्या काही भागांत हे कृत्य घडत असते. अल्पवयीन मुलांकडून काम करून घेणे. तसेच, त्यांच्यावर अत्याचार करणे अशा प्रकारच्या घटना या बालकामगाराच्या प्रकारात घडत असतात.   उत्तराखंडच्या हरिद्वार येथे चक्क वरिष्ठ न्यायाधीशांच्या घरातून घरकाम करणाऱ्या बालकामगाराची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला अयोगाच्या सदस्यांनी या मुलीची सुटका केली. या मुलीच्या शरीरावर […]

न्यायाधीशांच्या घरात घडत होते हे कृत्य; महिला आयोगाच्या सदस्यांनी केला प्रकार उघड

वृत्तसंस्था, उत्तराखंड

बालकामगाराला बंदी असतांनादेखील देशाच्या काही भागांत हे कृत्य घडत असते. अल्पवयीन मुलांकडून काम करून घेणे. तसेच, त्यांच्यावर अत्याचार करणे अशा प्रकारच्या घटना या बालकामगाराच्या प्रकारात घडत असतात.  

उत्तराखंडच्या हरिद्वार येथे चक्क वरिष्ठ न्यायाधीशांच्या घरातून घरकाम करणाऱ्या बालकामगाराची सुटका करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महिला अयोगाच्या सदस्यांनी या मुलीची सुटका केली. या मुलीच्या शरीरावर अनेक जखमाही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. आणि अखेर मुलीची सुटका करण्यात आली.

          

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number