मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद पाणीप्रश्नाची बैठक संपन्न

हातात दंडुका घेऊन औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न मिटवा अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 जूनला जाहीर सभेत अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यांनतर आज पुन्हा मुख्यमंत्री शहरातील पाणीटंचाईचा ऑनलाइन आढावा घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यातल्या त्यात प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात लोकांच्या नळापर्यंत अजूनही सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याचे चित्र आहे. […]

मुख्यमंत्र्यांची औरंगाबाद पाणीप्रश्नाची बैठक संपन्न

हातात दंडुका घेऊन औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न मिटवा अशा सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 जूनला जाहीर सभेत अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यांनतर आज पुन्हा मुख्यमंत्री शहरातील पाणीटंचाईचा ऑनलाइन आढावा घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यातल्या त्यात प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरीही प्रत्यक्षात लोकांच्या नळापर्यंत अजूनही सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद शहराच्या पाणीप्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी दोन जून रोजी मुंबईत बैठक घेतली होती. त्यानंतर आठ जून रोजी त्यांची औरंगाबादेत जाहीर सभा झाली. या सभेतही त्यांनी शहराच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख केला होता. दोन जून रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी मंत्रालयातील संकल्प कक्षातून औरंगाबादच्या पाणीप्रश्नाबद्दल आणि नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाबद्दल नियमित आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.

त्यानुसार शुक्रवारी  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे होते. व्हीसीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी प्रशासक सुनील चव्हाण यांच्यासह महापालिकेचे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. या बैठकित पाणीप्रश्नासाठी मुख्यमंत्री औरंगाबादला जाऊन पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री दर १५ दिवसाला घेणार आढावा घेणार आहेत. पाणीपुरवठा योजनेची गती वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number