मुख्यमंत्र्यांचं जाहिरातीवर स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, एवढी शिवसेना – भाजपची युती कमजोर नाही. देवेंद्र व आमची मैत्री एकदम जोरदार आहे, असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. […]

मुख्यमंत्र्यांचं जाहिरातीवर स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, एवढी शिवसेना – भाजपची युती कमजोर नाही. देवेंद्र व आमची मैत्री एकदम जोरदार आहे, असे ते म्हणालेत.

शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी पालघर येथील कार्यक्रमात आपल्यात कोणताही विसंवाद नसल्याचे स्पष्ट केले. पण प्रत्यक्षात व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर जवळपास 10 मिनिटे या नेत्यांत कोणताही संवाद झाला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीसांत नक्की काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिंदेंनी शुक्रवारी या प्रकरणी पुन्हा या स्पष्टीकरण देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे तुटेल, युती एवढी कमजोर नाहीये. ही युती वेगळ्या वैचारिक भूमिकेतून केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. वर्षभरामध्ये यामध्ये जो कोणी मिठाचा खडा टाकला होता, तो आम्ही खड्यासारखा काढून फेकून दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number