आनंद दिघे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आनंद आश्रम आणि शक्तिस्थळ येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई आणि प्रताप सरनाईक असे नेते देखील येणार असल्याची माहिती आहे. गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेनी अभिवादन केलं होत, मात्र आनंद आश्रमात जाणं टाळलं होतं. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एकनाथ शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला ठाकरे गट विरोध करणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
अनेक कार्यक्रम आहे. पहिला कार्यक्रम आहे तो परीक्षेपर चर्चा आणि परीक्षेपर चर्चा जो कार्यक्रम आहे. तो एकनाथ शिंदे ज्या शाळेत शिकले त्या शाळेतून हा पूर्ण कार्यक्रम असणार आहे. आणि त्या नंतर आनंद दिघेंच्या जयंती निमित्त खूप कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये आनंद दिघे मट असेल. शक्तिस्थळ आहे असे अनेक कार्यक्रम असेल तिथे शक्तीप्रदर्शन करणार आहे. एकनाथ शिंदेंचं भाषण होऊ शकतं.