भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याला उद्देशून भाषण केले. या भाषणानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.
राज्याला उद्देशून केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्य शासन महाराष्ट्राच्या विकासाकरिता वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारसोबत समन्वय राखून महाराष्ट्राला देशात एक अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र दिनानिमित्त देश व राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
शासन आपल्या दारी’ योजनेचा कोट्यवधींना फायदा
केंद्रासह राज्यातही विकासाची गंगा वाहते आहे
राज्यातील जनतेसाठी चांगले दिवस आणणार
स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण