उत्तराखंडात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पराभूत  

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खटिमा मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या भुवन चंद्र कापडी यांनी पुष्कर सिंह धामी यांना हरवले आहे. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’, अशी परिस्थिती उद्भवली आहे. उत्तराखंड विधानसभेत ७० जागांवर मतदान झाले आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून भाजपची […]

उत्तराखंडात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पराभूत  

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा खटिमा मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या भुवन चंद्र कापडी यांनी पुष्कर सिंह धामी यांना हरवले आहे. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’, अशी परिस्थिती उद्भवली आहे.

उत्तराखंड विधानसभेत ७० जागांवर मतदान झाले आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली असून भाजपची ४७ आणि काँग्रेसची १९ जागांवर आघाडी आहे. आणि इतर प्रादेशिक पक्ष ४ जागांवर पुढे आहे. उत्तराखंडात पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाल्यामुळे उत्तराखंडामध्ये गड आला पण सिंह गेला, अशी भाजपाची परिस्थिती झाली आहे.

खटिमा मतदारसंघातून काँग्रेसच्या भुवन चंद्र कापडी यांनी धामी यांचा पराभव केला आहे. उत्तराखंडमध्ये विधानपरिषद अस्तित्वात नसल्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घ्यावा लागू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number