‘मुख्यमंत्री गुंड तर, गृहमंत्री फडतूस’

‘मुख्यमंत्री गुंड तर, गृहमंत्री फडतूस’ अशी आगपाखड उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  केली आहे. ‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही तर गुंडमंत्री आहेत’, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केले. सोबतच, ‘महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलेत’, असे वक्तव्यही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत उद्धव ठाकरे यांनी केले. ‘हे […]

‘मुख्यमंत्री गुंड तर, गृहमंत्री फडतूस’

‘मुख्यमंत्री गुंड तर, गृहमंत्री फडतूस’ अशी आगपाखड उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  केली आहे.

‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही तर गुंडमंत्री आहेत’, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केले. सोबतच, ‘महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलेत’, असे वक्तव्यही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत उद्धव ठाकरे यांनी केले. ‘हे सरकार नपुंसक आहे’, अशी सरकारवर टीका करत ‘हिंमत असेल तर ठाण्यातील पोलीस आयुक्तांचं निलंबन करा’, असे आव्हानही फडणवीसांना केले आहे.

‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही तर गुंडमंत्री’

“एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील.”, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच, “मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं”, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.

‘एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे’

“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे… मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

ठाण्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी उद्धव गटाची एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यातील रुग्णालयात जाऊन त्या महिलेची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर आगपाखड केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number