मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रभू श्रीराम चरणी लीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती करण्यात आली. शिंदे-फडणवीस यांनी अयोध्येत नव्याने […]

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रभू श्रीराम चरणी लीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदार-खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती करण्यात आली.

शिंदे-फडणवीस यांनी अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसंच त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. तसंच रामजन्मभूमी तीर्थस्थानचे महासचिव चंपत राय आणि अयोध्येतील महंतही उपस्थित होते.

या आरतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना श्रीरामाला राज्य सुजलाम सुफलाम करण्याचे साकडे घातले आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर व्हावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले आहे. येथून श्रीरामाचे आशिर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाणार आहोत आणि मोठ्या उत्साहात काम करणार आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number