१ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याची घोषणा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यसरकारमधील तीन मंत्र्यांचे घोटाळे उघड करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या बुलडाणा दौऱ्यावर आहेत. अशोक चव्हाण यांच्या संस्थांना बुलडाणा अर्बनने दिलेल्या कर्जाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी बुलडाण्यात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या म्हणाले, २४ महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला लुटण्याचे कारस्थान चालवले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोहिम उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अशोक चव्हाणांच्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे सांगत बुलडाणा अर्बनचा तपास सुरू करायचा नाही असेही ते म्हणाले.
बुलडाणा अर्बन पतसंस्थेने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यामुळे यासंबंधी प्रकरणाची आयकर विभागाच्या पथकाने बुलडाणा अर्बन पतसंस्थेची चौकशी केली होती. आता भाजप नेते किरीट सोमय्या बुलडाणा दौऱ्यावर असून अशोक चव्हाण यांच्या संस्थांना बुलडाणा अर्बनने दिलेल्या कर्जाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.