ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सक्रिय

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्तीची काम या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. पावसाळ्यात ठाणे-कशेळी रस्त्यात मोठ्या प्रमाणात […]

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सक्रिय

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्तीची काम या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची एकत्र बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यात ठाणे-कशेळी रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे होत असून यामुळे दुखापत होण्याची मोठी संभावना असते. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. एम.एम.आर.डी.एच्या माध्यमातून हा रस्ता ६०% पूर्ण करण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच १ जूनपूर्वी रस्त्यांची काम १००%पूर्ण करावीत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन सुरळीत झाल्यास नागरिकांना आणि प्रवाशांना पावसाळ्यात दिलासा मिळणार आहे. तसेच, पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करणार असल्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

साकेत-खारेगाव पुलावर होणारी वाहतुक कोंडी रोखण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यामातून मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत तसेच गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

ठाणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान अनेकदा काल्हेर ते आर.सी.पाटील दरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या पाईपलाईन रस्त्याचा वापर केला जातो. या पाईपलाईन रस्त्याची डागडुजी ताबडतोब करून रस्ता सुस्थितीत आणण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number