Chhtrapati Sambhajinagar Water Supply : छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा दिवस नसणार पाणी, कारण समोर

येथे २५०० मिलीमिटर व्यास असणारी जलवाहिनी तोडण्याचे काम सुरू आहे.  त्यामुळे आता रविवारपासून सुमारे सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 

Chhtrapati Sambhajinagar Water Supply :  छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा दिवस नसणार पाणी, कारण समोर

छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न काही दिवस गंभीर होणार आहे. शहरामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण रोडवरील टाकळी फाटा येथे २५०० मिलीमिटर व्यास असणारी जलवाहिनी तोडण्याचे काम सुरू आहे.  त्यामुळे आता रविवारपासून सुमारे सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 

त्याचप्रमाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. जलवाहिनीवर शटडाऊन असल्याने काही दिवस पाणीपुरवठादेखील बंद राहणार आहे. दरम्याने पाणी वितरणात एक ते दोन दिवस उशीर होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. 

हेही वाचा – Pune Navale Bridge: पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी आता 'हे' नवे नियम 

समोर आलेल्या माहितीनुसार, शटडाऊनदरम्यान 700 मिमी आणि 1200 मिमी व्यासाच्या दोन लाईनवरूनच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा मर्यादित राहणार असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी वेळेवर मिळण्यात अडचणी येतील असेही स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा – Ladki Bahin Yojna : eKYC करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावाधाव! उरला फक्त एकच दिवस

कुठे कुठे पाणीपुरवठा उशीराने होणार ? 
‎चिकलठाणा, हनुमान टेकडी आणि विश्वभारती कॉलनी येथील जलकुंभांवरून होणारा पुरवठा अधिक उशिरा होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number