छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात २२ जवान शहीद

छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, २२ जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चकमकीत जवानांनी […]

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात २२ जवान शहीद

छत्तीसगडमधील विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, २२ जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चकमकीत जवानांनी १५ नक्षल्यांना कंठस्नान घातलं आहे.

या कारवाईत संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते. यावेळी नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांकडून गोळीबार करण्यात आला.या चकमकीत सुरक्षा दलातील पाच जवान शहीद झाले, तर अन्य १२ जण जखमी झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती.

या शोधमोहिमेदरम्यान बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात आढळून आले. त्यामुळे नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत एकूण २२ जवान शहीद झाले आहेत, तर एक जवान अजूनही बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईत तब्बल ३१ जवान जखमी झाले आहेत. जवानांना तातडीने विजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून, सात जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number