‘छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’

औरंगाबाद  की छत्रपती संभाजीनगर यामध्ये अनेकदा वेगवेगळे समज होते. परंतु आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. जोपर्यंत […]

‘छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’

औरंगाबाद  की छत्रपती संभाजीनगर यामध्ये अनेकदा वेगवेगळे समज होते. परंतु आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.

जोपर्यंत अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत जुनीच नावे वापरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महा अधिव्यक्तांनी बदलेली नावे न वापरण्याचं स्पष्ट केलं असलं तरी कर्मचारी बदलेली नावे वापरात असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील अंतिम सुनावणी अजून झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number