Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! मदत करणाऱ्या माजी नगरसेवकालाच बेदम मारहाण, नेमकं झालं तरी काय?

सुसाट रिक्षा व कारचा अपघात झाला, त्याच वेळी एक माजी नगरसेवक तिथून जात होते.  अपघातात रिक्षा उलटली. माजी नगरसेवकाने सहकाऱ्यांसह धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. 

Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक!  मदत करणाऱ्या  माजी नगरसेवकालाच बेदम मारहाण, नेमकं झालं तरी  काय?

सुसाट वेगात जाणाऱ्या रिक्षा आणि कारचा अपघात झाल्यानंतर जखमींच्या मदतीसाठी धावलेल्या एका माजी नगरसेवकाला रिक्षा मालकाच्या मुलाने अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न केला. ही घटना छत्रपती संभाजी नगर शहरात घडली. गैरसमजातून घडलेल्या प्रकारात वाद वाढून माजी नगरसेवकासह दोन ते चार जणांच्या गटाने तरुणाला बेदम चोप दिला. रात्री ११ वाजता छत्रपती संभाजी नगर शहरातील सूतगिरणी चौक ते शहानूरमियाँ दर्गा रस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला. सुसाट रिक्षा व कारचा अपघात झाला, त्याच वेळी एक माजी नगरसेवक तिथून जात होते.  अपघातात रिक्षा उलटली. माजी नगरसेवकाने सहकाऱ्यांसह धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. 

त्यांनी जखमींना रस्त्याच्या बाजूला बसवले. रिक्षामालकाचा मुलगा जवळच्याच परिसरात होता. त्यानेही तिथे धाव घेतली. रिक्षाचालक व तोही नशेत होता. तो अचानक माजी नगरसेवकावर धावून गेला. त्यातून गैरसमज वाढून मोठा जमाव जमला. माजी नगरसेवकाच्या मुलांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. वाद चिघळून त्यांनी रिक्षामालकाच्या मुलाला बेदम चोप देण्यास सुरुवात केली.


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number