Chhatrapati Sambhajinagar: अवघ्या 20 मिनिटांत 9 तोळे सोने, दीड किलो चांदी आणि रोकड लंपास; प्रतापनगरातील घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

छत्रपती संभाजीनगरातील प्रतापनगर परिसरात महिला डॉक्टरांच्या बंद घरात चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटांत 9 तोळे सोने, दीड किलो चांदी आणि 80 हजारांची रोकड लंपास केली

Chhatrapati Sambhajinagar: अवघ्या 20 मिनिटांत 9 तोळे सोने, दीड किलो चांदी आणि रोकड लंपास; प्रतापनगरातील घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रतापनगर परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाच्या बंगल्यावर झालेल्या सशस्त्र दरोड्याची घटना ताजी असतानाच आता त्याच परिसरातील एका महिला डॉक्टरांच्या घरात धाडसी चोरीची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती देशमुख या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला. अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी प्रथम लोखंडी लॅच लॉक तोडले आणि त्यानंतर लाकडी दरवाजाची चौकट फोडून घरात प्रवेश केला.

हेही वाचा: Yastika Bhatia: क्रिकेटच्या पंढरीवर यस्तिका भाटियाने रचला इतिहास; लॉर्ड्सवर 'हा' विक्रम करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाट फोडून त्यामधील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या चोरीत सुमारे ९ तोळे सोन्याचे दागिने, दीड किलो चांदीचे दागिने आणि सुमारे ८० हजार रुपयांची रोकड असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार अवघ्या २० मिनिटांत घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

ही चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यावर झालेल्या सशस्त्र दरोड्यात ज्या प्रकारे दरवाजे तोडण्यात आले होते, त्याच पद्धतीचा वापर या चोरीतही झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता तपासली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांच्या प्रतिसादावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या डॉ. देशमुख यांना अधिकारी उपलब्ध नसल्याचे आणि तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकही उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने तपासाच्या गतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: IAS Srishti Dabas: कौतुकास्पद! रिझर्व्ह बँकेतील 8-9 तासांची नोकरी आणि कौटुंबिक संकटांवर मात; पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये देशात 6 वा रँक

प्रतापनगर परिसरात अल्पावधीतच घडलेल्या दोन गंभीर घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, संशयितांवर तातडीने कारवाई करावी आणि परिसरातील सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number