Chhatrapati Sambhajinagar Exam Scam: नोकरीच्या आशेने शेकडो तरुण आले, परीक्षा केंद्रावर वेगळंच चित्र; संभाजीनगरमध्ये संताप

त्यामुळे आपल्यासोबत फसवणूक झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

Chhatrapati Sambhajinagar Exam Scam: नोकरीच्या आशेने शेकडो तरुण आले, परीक्षा केंद्रावर वेगळंच चित्र; संभाजीनगरमध्ये संताप

छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावर आकर्षक नोकरी मिळण्याच्या आशेने आलेल्या शेकडो तरुणांना मोठा धक्का बसला. महाराष्ट्रातील विविध भागांतून उमेदवार उस्मानपुरा परिसरातील एका शाळेत कथित भरती परीक्षेसाठी पोहोचले होते. मात्र, केंद्रावर गेल्यानंतर परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही संगणक व्यवस्था नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे आपल्यासोबत फसवणूक झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, संबंधित खासगी कंपनीकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. अर्जासाठी उमेदवारांकडून ५०० ते ७०० रुपयांपर्यंत शुल्क घेण्यात आलं. त्यानंतर विमानतळावर नोकरी आणि दरमहा तब्बल 25 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. भरती प्रक्रिया अधिकृत असल्याचा विश्वास निर्माण झाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज केला. काही उमेदवार गेल्या महिनाभरापासून परीक्षेची तयारी करत होते.

हेही वाचा – Mumbai HC Chief Justice: मुंबई उच्च न्यायालयाला मिळणार नवे सरन्यायाधीश; कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचं उमेदवारांना सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर संगणकच उपलब्ध नसल्याचं समोर आलं. याबाबत विद्यार्थ्यांनी संबंधितांकडे विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेल्या कथित थर्ड पार्टी कंपनीच्या प्रतिनिधींनीही आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगितल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे परीक्षा नेमकी कोण घेणार आणि भरती प्रक्रिया कोणी राबवली, याबाबत प्रश्न उपस्थित झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या घटनेमुळे बेरोजगार तरुणांच्या नोकरीच्या अपेक्षांचा गैरफायदा घेतला जात असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सीजेपीचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांनीही बेरोजगारीच्या प्रश्नावरून सरकारवर निशाणा साधला. युवकांमध्ये रोजगाराच्या संधींबाबत असंतोष वाढत असून, संभाजीनगरमधील घटना त्याच नाराजीचं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं. आता संबंधित कंपनीने उमेदवारांकडून घेतलेल्या शुल्काबाबत आणि कथित भरती प्रक्रियेबाबत पुढील तपासात काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number