सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वरिष्ठाकडून झालेल्या अपमानामुळे वाहतूक नियंत्रकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी आगारप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये ही घटना घडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या कथित अपमानामुळे एका वाहतूक नियंत्रकाने आत्महत्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सिल्लोड येथील शरद विठ्ठल भिवसने (वय 40) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी आनंद पार्क परिसरात उघडकीस आली.
समोर आलेल्या माहितीनुसार, शरद विठ्ठल भिवसने सिल्लोड आगारात सहायक वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकारामुळे वैद्यकीय रजेवर होते. शरद यांचे भाऊ पोपट भिवसने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शरद भिवसने हे बुधवारी सकाळी सिल्लोड आगारात हजर होण्यासाठी गेले होते. यावेळी आगारप्रमुख विजय काळवणे तसेच सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल आणि विकास चव्हाण यांनी त्यांच्या वेशभूषेवरून व वैयक्तिक स्वरूपावरून अपमानास्पद टिप्पणी केली. तसेच जातीवाचक शब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वरिष्ठाकडून झालेल्या अपमानामुळे वाहतूक नियंत्रकाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी आगारप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये ही घटना घडली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या कथित अपमानामुळे एका वाहतूक नियंत्रकाने आत्महत्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सिल्लोड येथील शरद विठ्ठल भिवसने (वय 40) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी आनंद पार्क परिसरात उघडकीस आली.
समोर आलेल्या माहितीनुसार, शरद विठ्ठल भिवसने सिल्लोड आगारात सहायक वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकारामुळे वैद्यकीय रजेवर होते. शरद यांचे भाऊ पोपट भिवसने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शरद भिवसने हे बुधवारी सकाळी सिल्लोड आगारात हजर होण्यासाठी गेले होते. यावेळी आगारप्रमुख विजय काळवणे तसेच सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल आणि विकास चव्हाण यांनी त्यांच्या वेशभूषेवरून व वैयक्तिक स्वरूपावरून अपमानास्पद टिप्पणी केली. तसेच जातीवाचक शब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठांकडून झालेला अपमान व मानसिक तणाव सहन न झाल्याने शरद भिवसने यांनी दुपारी भराडी रस्त्यावरील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात आगारप्रमुख व दोन सहायक अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.