छत्रपती संभाजीनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील जटवाड्याजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 11जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड व शस्त्रांनी पठाण कुटुंबावर हल्ला चढवला.
या मारहाणीत दादा पठाण जागीच ठार झाले, तर मुलगा माजेद, जुनैद व आणखी एक जण गंभीर जखमी झाले. गट क्रमांक 198 मधील साडेचार एकर जमिनीच्या मालकीवरून 2022 पासून वाद सुरू होता. हसूल पोलिस ठाण्यात 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून एकास अटक, दहा आरोपी फरार आहेत.
हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! मदत करणाऱ्या माजी नगरसेवकालाच बेदम मारहाण, नेमकं झालं तरी काय?
हा संपूर्ण प्रकार एका व्हिडिओत कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्य पाहून परिसरात संताप आणि धडकी भरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी रात्रीपर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतले असून, उर्वरित दहा जण फरार आहेत.