Chhatrapati Sambhajinagar Crime: संतापजनक! सावत्र बापाने पाच वर्षीय गतीमंद बालकाला गळा दाबून निर्घृणपणे संपवलं, आईदेखील गुन्ह्यात सहभागी

या अमानुष कृत्यात आईनेही साथ दिल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar  Crime: संतापजनक! सावत्र बापाने पाच वर्षीय गतीमंद बालकाला गळा दाबून निर्घृणपणे संपवलं, आईदेखील गुन्ह्यात सहभागी

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे,  बायपास परिसरातील शेतात 5 वर्षांचा गतिमंद बालक ओंकार याची त्याच्या सावत्र बापानेच गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. दुसऱ्या लग्नासाठी अडसर ठरत असल्याने गतीमंद 5 वर्षीय चिमुकल्याची सावत्र बापाकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यात आईनेही साथ दिल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको व गुन्हेशाखेच्या पोलिसांनी २४ तासांत आरोपी संतोष सोनाजी ढाळे (३४, रा. मोप, जि. वाशिम ) आणि पत्नी पूजा (२९) यांना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील सावंगी बायपास परिसरातील ही घटना असून, आरोपींनी बालकाचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 

हेही वाचा – Paydhooni Family Death : पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट! आतापर्यंत 100 हून अधिक व्यक्तींचे जबाब, पण पोलिसांना वेगळाच संशय 

समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे चार महिन्यांपूर्वी पूजाची ओळख संतोष ढाळे याच्याशी झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी शिर्डी येथील मंदिरात जाऊन लग्न केले. मागील महिन्याभरापासून ते चिकलठाणा येथील सावित्रीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. संतोष दारूच्या नशेत वारंवार ओंकारला मारहाण करत असे. अखेर मुलाला कायमचे दूर करण्यासाठी दोघांनी मिळून खुनाचा कट रचला.

हेही वाचा – Thane Fire: मोठी बातमी! ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला आग; मोठं नुकसान, जिवीतहानी टळली 

दुसऱ्या संसारात मुलगा अडसर ठरत असल्याने त्याला सतत मारहाण केली जात होती. सोमवारी मध्यरात्री आरोपींनी बालकाची हत्या करून मृतदेह गावाजवळील शेतात फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. तांत्रिक तपास आणि चौकशीतून संशय बळावल्याने सावत्र वडील आणि आईला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number