नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट लावून उडवली बुलेटप्रूफ गाडी; एक जवान शहीद

जय महाराष्ट्र न्यूज, छत्तीसगड   नक्षलवादी हल्ल्यात सी-60 कमांडोचा एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणत सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवून दिली.   सी-६० कमांडोची एक टीम परिसरातून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यानंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत सी-60 कमांडोचा एक जवान शहीद झाला.   रमेश तेलामी […]

नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट लावून उडवली बुलेटप्रूफ गाडी; एक जवान शहीद

जय महाराष्ट्र न्यूज, छत्तीसगड

 

नक्षलवादी हल्ल्यात सी-60 कमांडोचा एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणत सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवून दिली.

 

सी-६० कमांडोची एक टीम परिसरातून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यानंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत सी-60 कमांडोचा एक

जवान शहीद झाला.

 

रमेश तेलामी असं शहीद कमांडोचं नाव आहे. सी-60 कमांडोंचं पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली.

 

या स्फोटात 12 जवान जखमी झाल्याची माहिती. यानंतर छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 

दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रायपूरमध्ये जाऊन जखमी जवानांची भेट घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number